News: पुरंदर विधानसभा मतदारसंघात निवडणूक विषयक प्रशिक्षण संपन्न

प्रतिनिधी (महाराष्ट्र ऑनलाईन न्युज): विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मतदान यंत्र हाताळणीबाबत आयोजित दोन दिवसीय प्रशिक्षण निवडणूक निर्णय अधिकारी वर्षा लांडगे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सचिन मस्के यांच्या उपस्थितीत वाघिरे महाविद्यालय सासवड येथे पूर्ण झाले.
निवडणूक निर्णय अधिकारी वर्षा लांडगे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सचिन मस्के यांनी ४३ क्षेत्रीय अधिकारी यांना मतदान यंत्र व व्हीव्हीपॅट हाताळणीबाबत प्रशिक्षण प्रशासकीय भवन सासवड येथे दिले.

यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती लांडगे आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी मस्के यांनी मतदानाच्या अनुषंगाने मतदान केंद्रांवरील कार्यवाही, विविध अहवाल, नियमावली तसेच भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचना आदींबाबत माहिती दिली
प्रशिक्षणामध्ये ४३ क्षेत्रीय अधिकारी व १० मास्टर प्रशिक्षकाद्वारे वीस मतदान यंत्रांचा वापर करून दोन सत्रांमध्ये १ हजार ८०२ कर्मचाऱ्यांना निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्याकरिता प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी अभिरूप मतदान (मॉक पोल), मशीन जोडणी, प्रदत्त मतदान, चॅलेंजिंग वोट, सैन्य दलातील जवानांसाठी प्रॉक्सी मतदान, मशीन सिलिंग प्रक्रिया व मतदान पूर्ण झाल्यानंतरच्या प्रक्रिया आदीबाबत प्रशिक्षण देण्यात आले.
