जेजुरी: शासकीय कामांसाठी लाच देणे-घेणे गुन्हा: पोलीस निरीक्षक लोणारे

प्रतिनिधी (महाराष्ट्र ऑनलाईन न्युज): कोणत्याही शासकीय कामांसाठी लाच देणे व घेणे कायद्याने गुन्हा आहे, भ्रष्टाचारमुक्त महाराष्ट्रासाठी सर्वांनी पुढे यावे, असे आवाहन पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस निरीक्षक प्रसाद लोणारे यांनी येथे केले. जेजुरी येथे आयोजित जनजागृती उपक्रमात लोणारे बोलत होते.

लोणारे म्हणाले, पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये विविध जनजागृती उपक्रम होत आहेत. कोणत्याही शासकीय कामासाठी आपण लाच देणे बंद करावे व संबंधित गैरप्रकार घडत असेल तर त्याबाबत तत्काळ आमच्या विभागात माहिती द्यावी. ग्राहक पंचायत कार्यकर्त्यांनी देखील अधिकाधिक नागरिकांना जागृत करावे, असे आवाहन लोणारे यांनी केले.

जेजुरी नगरपरिषद, तलाठी कार्यालय, मंडल अधिकारी कार्यालय तसेच पोलिस ठाण्यात जाऊन पत्रके भिंतीवर चिकटवण्या आली. तसेच जेजुरी आठवडे बाजार मध्ये ही नागरिकांना याबाबत जनजागृती करण्यात आली. त्यासाठी कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. गावातील अनेक नागरिक उपस्थित होते.