Crime News: बेकायदेशीर गोमास वाहतूक करणारी वाहने गोरक्षकांनी पकडली; सुमारे 2,40,000/- रु. कि. गोमांस मिळुन आले

प्रतिनिधी (महाराष्ट्र ऑनलाईन न्युज): जेजुरी पोलीस स्टेशन हद्दीतील निरा ता. पुंरदर, जि. पुणे कॅनलचे जवळ नंदन डेअरीचे समोर जेजुरी- नीरा रोडवर वाहनातुन अदांजे 2,40,000/-किंमतीचे 2,000/- किलो ( दोन टन ) गोंमास कोणाताही कायदेशीर वाहतुक परवाना नसताना वाहतुक करताना मिळुन आले आहेत याबाबत फिर्यादी अभिषेक सुनिल मुळे (वय 26 वर्षे) धंदा- नोकरी खाजगी रा. 303 गणेश पेठ लक्ष्मीरोड पुणे यांनी आरोपी- 1) इंडीका कार नंबर एमएच 04 ईक्यु 2546 2) सेंन्ट्रो कार नंबर एमएच 12 बीजी 7541 यावरील दोन अज्ञात कार चालक यांच्या विरोधात जेजुरी पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली आहे.

याबाबत जेजुरी पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 04/10/2024 रोजी 06:00 वा फिर्यादी तसेच माझे सोबत गोरक्षणांचे काम करणारे इसम नामे- 1) गौरव जितेंद्र ठाकर, 2) प्रतिक प्रकाष बोबडे, 3) ऋत्वीक अजित भगत 4) सागर चंद्रकांत माने सर्व रा. सिंहगड रोड पुणे असे आम्ही आम्हाला मिळाले गुप्त माहीतीचे अनुंषगाने पडताळणी करून कारवाई करणेकामी मौजे नीरा ता. पुंरदर, जि. पुणे येथे शिवाजी चौकात आमचेकडील चारचाकी वाहनासह थांबुन होतो. त्यादरम्यान बारामती बाजुकडुन आम्हाला गुप्त माहीती मिळालेल्या नंबरची वाहन क्रमांक 1) इंडीका कार नंबर एमएच 04 ईक्यु 2546 2) सेंन्ट्रो कार नंबर एमएच 12 बीजी 7541 अशी वाहने शिवाजी चौकातुन जेजुरी बाजुकडे जाताना दिसली असता त्यांना आम्ही थांबविण्याचा प्रयत्न केला असता वाहनांमधील चालकानी आमचेकडे पाहुन ती वाहने तशीच वेगाने जेजुरी बाजुकडे घेवुन जावु लागले त्यांनतर आम्ही आमचे चारचाकी वाहन घेवुन त्यांचा पाठलाग करून नीरा गावापासुन जेजुरी बाजुकडे कॅनलचे जवळ नंदन डेअरीचे समोर ती वाहने थांबविण्याचा प्रयत्न केला तेंव्हा त्या दोन वाहंनाचे चालकांनी त्यांचेकडील ती वाहने रोडवर थांबवुन तशीच चालु अवस्थेत सोडुन देवुन त्या दोन्ही वाहंनाचे चालक तेथील झाडाझुडपाचा फायदा घेवुन पळुन गेले. त्यांनतर आम्ही इंडीका कार नंबर एमएच 04 ईक्यु 2546 व सेंन्ट्रो कार नंबर एमएच 12 बीजी 7541 या दोन्ही वाहनांचे जवळ गेलो असता त्यामधुन उग्र वास येत होता म्हणुन आम्ही त्या दोन्ही वांहनाचे दरवाजे उघडुन पाहीले असता त्यामध्ये गोंमास मिळुन आले. ते गोमांसची पाहणी केली असता दोन्ही वाहनात मिळुन अदांजे 2,40,000/- किंमतीचे प्रति किलो 120/- रू प्रमाणे 2,000 किलो ( दोन टन) गोंमास मिळुन आले म्हणुन ती वाहने त्यामधील गोमांससह घेवुन दोन अज्ञात चालकाविरूध्द कायदेशीर फिर्याद देण्यास आली आहे.
दिनांक 04/10/2024 रोजी 06:00 वाजण्याचे दरम्यान निरा ता. पुंरदर जि. पुणे कॅनलचे जवळ नंदन डेअरीचे समोर जेजुरी नीरा रोडवर येथे अनुक्रमे वाहन क्रमांक 1) इंडीका कार नंबर एमएच 04 ईक्यु 2546 2) सेंन्ट्रो कार नंबर एमएच 12 बीजी 7541 यावरील दोन अज्ञात कार चालक हे त्यांचेकडील वाहनातुन अदांजे 2,40,000/-किंमतीचे प्रति किलो 120/- रू प्रमाणे 2,000/- किलो ( दोन टन ) गोंमास कोणाताही कायदेशीर वाहतुक परवाना नसताना वाहतुक करताना मिळुन आले आहेत म्हणुन त्या दोघांचे विरूध्द कायदेशीर फिर्याद आहे. यावरून जेजुरी पोलीस स्टेशन गु र नं 343/2024 भारतीय न्याय संहिता 2023 कलम- 325, मोटार वाहन का क-192,66(1),86,म पशु संरक्षण अधि -11,5 सी ,9 ए नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरचा अधिक तपास जेजुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दीपक वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पो स ई पुजारी हे करत आहेत.