क्राईम

Crime News: घोडनदी पात्रात मिळून आलेल्या मृतदेहाची ओळख पटवून, खुनाचे गुन्ह्याचा केला उलगडा, तीन आरोपी जेरबंद

प्रतिनिधी (महाराष्ट्र ऑनलाईन न्युज): दि. ३१/०१/२०२४ रोजी १०/०० वा पुर्वी शिरूर गावचे हद्दीत पाचर्णे मळा येथे घोडनदी पात्रात रामभाऊ पाचर्णे याचे शेताजवळ अनोळखी व्यक्तीचा मृतदेह हातपाय बांधलेल्या स्थितीत मिळून आला होता. मयतास मारहाण करून त्याचे हातपाय बांधून पुरावा नष्ट करण्याचे उद्देशाने नदीत टाकून देवून त्याचा खून केला असलेबाबत शिरूर पोलीस स्टेशन येथे अकस्मात मयताचे तपासादरम्यान गु.र.नं. ८०/२०२४ भा.दं.वि.का.क. ३०२,२०१ प्रमाणे गुन्हा नोंदविणेत आला होता.

सदरचा गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने गुन्हयाचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण चे वतीने तात्काळ सुरू करणेत आला. पंकज देशमुख, पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण यांनी गुन्हा उघडकीस आणण्याचे अनुषंगाने मार्गदर्शन व सुचना दिल्या. मृतदेहाचे हातपाय बांधलेले होते व मयतास मारहाण करणेत आलेली होती, त्यामुळे सदरचा प्रकार हा खूनाचा असल्याचे निष्पन्न करणेत आले होते. मृतदेह नदीपात्रात पाण्यात मिळून आल्याने चेहरा ओळख पटविणे अडचणीचे होते, परंतु स्था.गु. शाखेच्या तपास पथकाने मृतदेहाची ओळख पटवून त्याचे नाव कृष्णा गोकूळ विघ्ने, (वय ३२ वर्षे), रा. आनंदगाव, शिरूर कासार ता. शिरूर कासार, जि. बीड असे असल्याचे निष्पन्न झाले.

मृतदेह मिळून आलेल्या ठिकाणापासून लगतच्या रोडचे दोन्ही बाजूकडील सीसीटीव्ही कॅमेरा तपासणेत आले, तपासादरम्यान गोपनीय बातमीदाराकडून बातमी मिळाली की, मयत कृष्णा गोकूळ विघ्ने याचा खून त्याचा भाऊ १) अजिनाथ गोकूळ विघ्ने, (वय २६ वर्षे), त्यांचा चलुता नामे २) पांडुरंग अर्जुन विघ्ने, (वय ५० वर्षे), दोघे रा. आनंद गाव, शिरूर कासार, ता. शिरूर कासार, जि.बीड, ३) गणेश प्रभाकर नागरगोजे, (वय २९ वर्षे) रा. एवलवाडी, ता. पाटोदा, जि. बीड यांनी केला असल्याची बातमी मिळाल्याने तपास पथकांनी बीड येथे आपला मोर्चा वळवून वरील इसमांना शिरूर कासार परीसरातून ताब्यात घेतले. सदर तीनही इसमांकडे चौकशी करता त्यांनी सदरचा गुन्हा केल्याचे सांगितले असून मयत कृष्णा गोकूळ विघ्ने हा व्यसनी होता, तो कुटुंबात नेहमी जमीन विक्री करा असे म्हणून भांडण करत असे त्या कारणास्तव आरोपींनी त्यास चारचाकी वाहन महिंद्रा जितो टेम्पो नं. एम. एच. १६ सी. डी. ३६८४ मध्ये आणून त्याचे हातपाय बांधून त्यास शिरूर शहरालगतचे घोडनदी पात्रात टाकून देण्यात आले व त्याचा खून करणेत आला असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक पंकज देशमूख, पुणे ग्रामीण, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे पुणे विभाग, यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, शिरूर पो स्टे चे पो नि ज्योतीराम गुंजवटे, स्था.गु.शा. कडील पो.स.ई. गणेश जगदाळे, पोलीस अंमलदार तुषार पंदारे, जनार्दन शेळके, राजू मोमीण, अतुल डेरे, योगेश नागरगोजे, मंगेश थिगळे तसेच शिरूर पोस्टे चे पोसई एकनाथ पाटील, पोलीस अंमलदार अरूण उबाळे, नाथा जगताप, रघुनाथ हाळनोर, नितेश थोरात, विकी यादव, सचिन भोई, संतोष साळुंखे यांनी केली आहे. आरोपी सध्या पोलीस कोठडी रिमांड मध्ये असून पुढील तपास सपोनि यादव हे करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button