News: पुरंदर विधानसभा मतदार संघाकरीता निवडणूक निरीक्षक यांची नियुक्ती

प्रतिनिधी (महाराष्ट्र ऑनलाईन न्युज) : भारत निवडणूक आयोगाकडून पुरंदर विधानसभा मतदारसंघासाठी निवडणूक निरीक्षक म्हणून नसीम खान यांची नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी वर्षा लांडगे यांनी दिली आहे.
खान यांनी तहसील कार्यालय येथील विधानसभा मतदारसंघाच्या कार्यालयास भेट देवून निवडणूक कामकाजाचा आढावा घेतला. निवडणूक कामकाजासाठी स्थापन करण्यात आलेल्या विविध कक्षांना भेट दिली. समन्वय अधिकाऱ्यांसोबत बैठक बोलवून त्यांना आवश्यक कामकाजाच्या अनुषंगाने सूचना दिल्या. खान यांनी नामनिर्देशन प्रक्रियेची व निवडणूक विषयक विविध कामकाजाचीही पाहणी केली.

श्री. नसीम खान यांचा निवासाचा पत्ता व्हीव्हीआयपी विश्रामगृह, पुणे येथील कक्ष क्रमांक ए-३०३ असा आहे. त्यांना सोमवार आणि बुधवारी सकाळी ११ ते १२ यावेळेत भेटता येईल. त्यांचा संपर्क क्रमांक ७००६०७९४३९ असा आहे. श्री. नजीम खान यांचे संपर्क अधिकारी श्री. राजेंद्र खंडाईत हे असून त्यांचा संपर्क क्रमांक ९४२२४५८५१० असा आहे, अशी माहिती श्रीमती लांडगे यांनी दिली.
