आपला जिल्हा
News: पक्क्या अनुज्ञप्तीसाठी शिबीर दौऱ्याचे आयोजन

प्रतिनिधी (महाराष्ट्र ऑनलाईन न्युज) : पिंपरी चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून जून महिन्यात पक्क्या अनुज्ञप्तीसाठी शिबीर दौऱ्याचे आयोजन करण्यात आले असल्याचे प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी कळविले आहे.

पिंपरी चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत खेड येथे ३ व ४ जून, मंचर येथे १० व ११ जून, जुन्नर येथे १८ व १९ जून, वडगाव मावळ येथे २४ व २५ जून तर लोणावळा येथे २७ व २८ जून या दिवशी पक्की अनुज्ञप्ती शिबीर दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
पक्क्या अनुज्ञप्तीचा कोटा ३१ मे रोजी सायंकाळी ५ वाजता उपलब्ध होणार असल्याचेही प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी कळविले आहे.