महाराष्ट्र

News: राज्यात दुपारी 3 वाजेपर्यंत इतके टक्के मतदानाची नोंद

प्रतिनिधी(महाराष्ट्र ऑनलाईन न्युज) : आज राज्यात लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात 11 जागांसाठी मतदान होत आहे. सकाळी 7 वाजता मतदानाला सुरुवात झाली. त्यानंतर 3 वाजेपर्यंत 42.63% मतदान झाले. बारामती, कोल्हापूर, माढा, रत्नागिरी -सिंधुदुर्ग, सांगली, सातारा, सोलापूर, धाराशिव, लातूर, रायगड व हातकणंगले या सर्वच 11 मतदार संघांतील मतदान केंद्रांवर मतदारांनी मतदानासाठी रांगा लावल्या आहेत. त्यामुळे पहिल्या दोन टप्प्यांच्या तुलनेत या टप्प्यात मतदानाचा टक्का वाढण्याची शक्यता आहे.

दुपारी 3 वाजेपर्यंत 42.63 टक्के मतदान-

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यातील 11 मतदारसंघांसाठी होणाऱ्या निवडणुकीत दुपारी 3 वाजेपर्यंत 42.63 टक्के मतदान झाले.

मतदानाची मतदारसंघनिहाय टक्केवारी खालीलप्रमाणे

लातूर – 44.48 टक्के, सांगली – 41.30 टक्के, बारामती – 34.96 टक्के, हातकणंगले – 49.94 टक्के, कोल्हापूर – 51.51 टक्के, माढा – 39.11 टक्के, उस्मानाबाद – 40.92 टक्के, रायगड – 41.43 टक्के, रत्नागिरी -सिंधुदूर्ग- 44.73 टक्के, सातारा – 43.83 टक्के, सोलापूर – 39.54 टक्के

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button