News: निवडणूक निरीक्षक प्रसाद लोलयेकर यांची माध्यम कक्षाला भेट

प्रतिनिधी(महाराष्ट्र ऑनलाईन न्युज) : जिल्हाधिकारी कार्यालयात माध्यम संनियंत्रणासाठी स्थापित करण्यात आलेल्या माध्यम कक्ष, निवडणूक खर्च समिती कक्ष व सी-व्हिजील कक्षास पुणे लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निरीक्षक प्रसाद लोलयेकर यांनी भेट दिली.
यावेळी जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. सुहास दिवसे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर, सी-व्हिजील कक्षाच्या समन्वयक अधिकारी ज्योती कावरे उपस्थित होत्या.

यावेळी जिल्हाधिकारी डॉ. दिवसे यांनी तीनही कक्षातील कामकाजाविषयी माहिती दिली. माध्यम कक्षाद्वारे समाजमाध्यमांवरील जाहिरातींवर बारकाईने लक्ष ठेवले जात असल्याचे सांगितले. सीव्हिजील ॲपवर येणाऱ्या तक्रारींबाबतही तातडीने कार्यवाही करण्यात येत असल्याचे ते म्हणाले.
निवडणूक निरीक्षक लोलयेकर यांनी माध्यम कक्षात इलेक्ट्रॉनिक, मुद्रीत व समाजमाध्यमांद्वारे प्रसारित होणाऱ्या जाहिराती, पेड न्यूज यावर अंकुश ठेवण्यासाठी करण्यात येत असलेल्या कामाकाजाची, तसेच खर्च समिती व सी-व्हिजील कक्षाच्या कामकाजाची माहिती घेतली.