आपला जिल्हा
News: देहविक्री व्यवसायातील महिलाकरीता बुधवार पेठ येथे मतदार नोंदणी शिबिराचे आयोजन

प्रतिनिधी (महाराष्ट्र ऑनलाईन न्युज): विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत नथूबाई हकमचंद गुजराथी शाळा बुधवार पेठ येथे देहविक्री व्यवसायातील महिलांकरीता मतदार नोंदणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
यावेळी उपजिल्हाधिकारी तथा स्वीप नोडल अधिकारी अर्चना तांबे, तहसीलदार राधिका बारटक्के, नायब तहसीलदार स्मिता कुलकर्णी, जिल्हा एड्स प्रतिबंधक नियंत्रण विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी सुधीर सरोदे, विविध संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.

मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमाअंतर्गत उपेक्षित घटकांच्या मतदार नोंदणीसाठी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. याचा अधिकाधिक नागरिकांनी लाभ घेऊन मतदान नोंदणी करावी, असे आवाहन श्रीमती तांबे यांनी यावेळी केले.
शिबिरात देहविक्री व्यवसायातील महिलांची मतदार नोंदणीकरीता एकूण ७८ अर्ज भरुन घेण्यात आले.