आपला जिल्हा
News: महाराष्ट्रात ‘या’ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता

प्रतिनिधी (महाराष्ट्र ऑनलाईन न्युज): राज्यात काही दिवसांपासून पाऊस हजेरी लावत आहे. अशातच आता हवामान विभागाने राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये वादळी वारे आणि मुसळधार पाऊस बारसण्याची शक्यता वर्तवली आहे.
राज्यातील पुणे, जळगाव, धुळे, सातारा,सोलापूर, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर,धाराशिव, बीड, जालना या १० जिल्ह्यांमध्येही मेघगर्जनेसह वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे.

तसेच राज्यातील नाशिक आणि अहमदनगरमध्ये तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी बरसण्याची दाट शक्यता आहे. याशिवाय पुढील दोन दिवस अशीच परिस्थिती कायम राहण्याची शक्यता आहे.