Crime News: जेजुरी येथे आढळला अनोळखी पुरुष मृतदेह

प्रतिनिधी (महाराष्ट्र ऑनलाईन न्युज): दिनांक 17/ 10/2024 रोजी दुपारी 11:00 वाजण्याचे सुमारास जेजुरी कचरा डेपो येथे एक अनोळखी पुरूष वय यंदाचे 55 ते 60 वर्ष चा मृतदेह मिळून आला आहे.

सदर पुरुष याचे पोस्टमार्टम जेजुरी ग्रामीण रुग्णालय येथे करण्यात आले असून त्याचा मृतदेह सध्या जेजुरी ग्रामीण रुग्णालय येथे शीतगृहात ठेवण्यात आला आहे. सदर मयताचे अंगात काळे जर्किंग,काळी पॅन्ट,पायात स्पोर्टस चे काळे बुट,एका हातात धागा, सदर बाबत जेजुरी पोलीस स्टेशन येथे अजित रंगनाथ जाधव रा. जेजुरी, ता. पुरंदर, जि. पुणे यांनी खबर दिली असून त्यावरून जेजुरी पोलीस स्टेशन अकस्मात मयत रजिस्टर नंबर 107/24 बी.एन.एस.एस.194 प्रमाणे मयत दाखल करण्यात आले आहे.
सदर मयताचा तपास स.पो.नि. दीपक वाकचौरे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार नंदकुमार पिंगळे करीत आहेत. तरी सदर माहिती बाबत काही एक माहिती मिळाल्यास जेजुरी पोलीस स्टेशन येथे संपर्क करावा.