Crime News: दरोडा, जबरी चोरी, घरफोडी चोरीचे गुन्ह्यातील पिडीत महिलांना त्यांचे चोरी गेलेले दागिने सुपूर्त करून महिलांना दिला भावनिक आनंद: पुणे ग्रामीण पोलीसांची कामगिरी
प्रतिनिधी (महाराष्ट्र ऑनलाईन न्युज): पुणे ग्रामीण जिल्हयातील दुर्गम भागात रात्रीचे वेळी दरोडा, जबरी चोरी, घरफोडी च्या घटना घडल्या होत्या. या घटनांमध्ये विशेषतः महिलांचे दागिने चोरी गेले होते. नागरीकांमध्ये भितीचे वातावरण तयार होवून महिलांचे दागिन्यांशी असलेले भाविनक नाते दुखावले होते. अंकित गोयल, पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण यांनी या घटनाप्रकारात स्वतः लक्ष देवून गुन्हे उघडकीस आणण्याचे अनुषंगाने मार्गदर्शन व सुचना दिल्या होत्या.
पुणे ग्रामीण पोलीस दलाचे वतीने घटनास्थळांना भेटी देवून रेकॉर्डवरील गुन्हेगार तपासणे, सीसीटीव्ही तपासणे, तांत्रिक विश्लेषणाचा आधार घेत सर्वोतोपरी प्रयत्न करून गुन्हे केलेल्या गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यात आल्या. गुन्हयात चोरी गेलेला मुद्देमाल हस्तगत करणेत आला. मुद्देमालातील सोन्याचे दागिन्यांमध्ये जास्तीत जास्त दागिने हे महिलांचे असल्याने अंकित गोयल, पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण यांनी संवेदनशील होवून महिलांचे दागिने लवकरात लवकर त्यांना सुपूर्त करणेकामी न्यायालयाकडून आदेश प्राप्त करून घेतले.

पुणे ग्रामीण जिल्हा पोलीस दलाचे माहे नोव्हेंबर २०२३ चे गुन्हे आढावा बैठकीदरम्यान गुन्हयात न्यायालयाकडून आदेश प्राप्त असलेल्या पाच गुन्हयांमधील चोरी गेलेले सोन्याचे दागिने, फिर्यादी व पिडीत महिलांना अंकित गोयल, पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण यांचे हस्ते सन्मानाने सुपूर्त करणेत आले.
सोन्याचे दागिन्यांबाबत महिलांचे भावनिक नाते असते, महिलांना त्यांचे आईवडीलांनी, पतीने तसेच नातेवाईकांकडून दागिने देण्यात आलेले असतात, त्यामुळे दागिन्यांबाचत महिला अतिशय संवेदनशील असतात, या कार्यक्रमाद्वारे पुणे ग्रामीण पोलीसांचे वतीने त्यांचे भावनांचा आदर, सन्मान करण्याचा प्रयत्न करणेत आला असल्याचे अंकित गोयल, पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण यांनी सांगितले आहे.
सोन्याचे दागिने परत मिळाल्याने फिर्यादी व पिडीत महिलांचे चेहऱ्यावर आनंद दिसून आला व त्यांनी पुणे ग्रामीण पोलीसांचे आभार व्यक्त केले असून सदर कार्यक्रमास पुणे ग्रामीण पोलीस दलातील सर्व वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते.