आरोग्य: कंबर दुखीवर हे आहेत घरगुती उपाय….

प्रतिनिधी (महाराष्ट्र ऑनलाईन न्युज): कंबरेच्या वेदना किंवा कंबर दुखणे ही सध्या एक सामान्य समस्या झाली आहे, व्यायामाचा अभाव, आधुनिक जीवनशैली, कोणत्याही शारीरिक स्थितीमध्ये बसणे यांसारख्या गोष्टींमुळे अगदी तरुण वर्गात सुद्धा हा आजार मोठ्या प्रमाणावर पसरला आहे. एकाच जागी खूप वेळ बसून काम करणे सुद्धा याला कारणीभूत आहे. अनेकांना पाठ दुखी, कंबर दुखीचा त्रास होतो. पाठीचा कणा, कंबर, कमरे खालील भाग संपूर्ण शरीराला आधार देतात. एकाच ठिकाणी तास-न्- तास बसून राहिल्यानंतर पाठीच्या मणक्यावर वाईट परिणाम होतात. यामुळे कदाचित चालणे, बसणे आणि उठणे देखील त्रासदायक ठरू शकतं.

कंबर दुखीवर हे आहेत घरगुती उपाय:
1) एक मोठा चमचा मोहरीचं किंवा नारळाचं तेल घ्या. त्यात लसणाच्या 5 ते 6 कळ्या घालून ते गरम करा. हे तेल थंड झाल्यावर ज्या ठिकाणी दुखत असेल तिथे आंघोळीआधी मसाज करा.
2) रोजच्या डाएटमध्ये कॅल्शियमयुक्त पदार्थांचा समावेश करा. तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार कॅल्शियम सप्लीमेंट्सही घेऊ शकता. यामुळे तुम्हाला कंबरदुखी दूर ठेवण्यास मदत मिळेल.
3) कमरेच्या दुखण्यातून सुटका मिळवण्यासाठी उपाय शोधत असाल तर नियमित योगासनांचा सराव करावा. तुमची कंबर दुखीतून सुटका होण्यास मदत होईल.
4) गरम पाण्यात मीठ घाला आणि त्यात टॉवेल भिजवून पिळून घ्या. टॉवेलच्या वाफेने हळूहळू शेक घ्या. हा शेक घेताना थेट त्वचेवर घेऊ नका. कॉटनचे कपडे घालूनच हा शेक घ्या.
5) तुळशीचे पाने एक कप गरम पाण्यात उकळावे. स्वादासाठी यात मध टाकावे आणि पाणी थंड होण्याआधी प्यावे. याचे नियमित सेवन केल्याने कंबर दुखी मध्ये दीर्घकाळ आराम मिळतो.
6) कंबर दुखीसाठी पोहणे, सायकल चालवणे, सकाळी फिरणे हे उत्तम व्यायाम प्रकार आहेत.
7) योग्य आहार, योग्य झोप, व्यायाम या त्रिसूत्रीचा अवलंब केल्यास कंबर दुखी नक्कीच गायब होईल.
टीप: कोणताही उपचार करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.