आपला जिल्हा

News: जिजामाता विद्यालयात कागदी पिशव्या बनवण्याची कार्यशाळा

प्रतिनिधी (महाराष्ट्र ऑनलाईन न्युज): श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ सासवड, संचलित जिजामाता हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज जेजुरी, ता. पुरंदर या विद्यालयात प्लास्टिक पिशव्यांना पर्याय म्हणून कागदी पिशव्या वापरण्याबाबत जनजागृती करण्यासाठी इयत्ता सहावी या वर्गातील १५५ विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक महामंडळाचे राज्य सचिव विद्यालयाचे राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त प्राचार्य नंदकुमार सागर, पर्यवेक्षक सतिश पिसाळ यांच्या मार्गदर्शनानुसार कागदी पिशव्या बनविण्याचे प्रशिक्षण कैलास सोनवणे, मीना भैरवकर, सोनबा दुर्गाडे, मयूर शिंदे, निर्मला निगडे, गणेश भंडलकर, योगेश घोरपडे, जयसिंग वसावे यांनी दिले.

प्रशिक्षणाचे नियोजन शाळा समन्वयक प्रल्हाद गिरमे, माध्यमिक विभाग प्रमुख बाळासाहेब जगताप, सोमनाथ उबाळे, महेश खाडे यांनी केले.

प्लास्टिक मुक्त भारत अभियान संपूर्ण देशामध्ये राबवले जात आहे, प्लास्टिकच्या पिशव्या वापरल्याने त्या जमिनीवर किंवा मातीत टाकल्यानंतर कुजत नाहीत, त्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत चाललेला आहे, तो ऱ्हास होऊ नये म्हणून सर्वांनी कागदी पिशव्यांचा वापर करावा, त्यामुळे बिया रुजत नाहीत, पर्यायाने नवीन रोप तयार होत नाही, त्यासाठी सर्वांनी कागदी पिशव्यांचा वापर करावा असे आवाहन प्राचार्य नंदकुमार सागर यांनी विद्यार्थ्यांना व पालकांना आव्हान केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button