News: जागतिक महिला दिनानिमित्त पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या अधिकृत संकेतस्थळाचे उद्घाटन

प्रतिनिधी (महाराष्ट्र ऑनलाईन न्युज): आज ८ मार्च २०२५ रोजी जागतिक महिला दिनानिमित्त, पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या अधिकृत संकेतस्थळाचे उद्घाटन पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण यांच्या अधिपत्या खाली महिला पोलीस अंमलदार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या संकेतस्थळामुळे सामान्य नागरिकांना पोलीस प्रशासनाशी संबंधित माहिती प्राप्त करणे अधिक सोयीचे होईल. संकेतस्थळ हे मोबाईल, टॅबलेट, आयपॅड यासारख्या उपकरणांवर सहजपणे कार्य करते आणि ते नियमितपणे अद्ययावत केले जाते.

संकेतस्थळावर नागरिकांसाठी महत्वाचे दुवे आणि विषयांकरीता स्वतंत्र टॅब उपलब्ध आहेत, जेणेकरून वापरकर्त्यांना आवश्यक माहिती मिळवणे सहज होईल. त्याचप्रमाणे, वरिष्ठ पोलीस अधिकारी, पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी आणि इतर शाखांचा अद्ययावत संपर्क क्रमांक देखील संकेतस्थळावर दिला आहे. यामुळे पुणे ग्रामीण जिल्ह्यातील नागरिकांना पोलीस प्रशासनाशी संबंधित माहिती सहजपणे मिळवता येईल आणि त्यांचा अनुभव अधिक सुलभ होईल.
