Crime News: जेजुरी येथे आढळला अनोळखी महिला मृतदेह

प्रतिनिधी महाराष्ट्र ऑनलाईन न्यूज
प्रतिनिधी (महाराष्ट्र ऑनलाईन न्युज): जेजुरी लक्ष्मी नगर येथे अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आला असून याबाबत जेजुरी पोलीस स्टेशनकडून मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 16/8/2024 रोजी दुपारी 03:00 वाजण्याचे सुमारास लक्ष्मी नगर येथे मरी आई माता मंदिर पत्रा शेडमध्ये एक अनोळखी महिला व यंदाचे 65 ते 70 वर्ष हिचा मृतदेह मिळून आला आहे. सदर महिला हिचे पोस्टमार्टम जेजुरी ग्रामीण रुग्णालय येथे करण्यात आले असून तिचा मृतदेह सध्या जेजुरी ग्रामीण रुग्णालय येथे शीतगृहात ठेवण्यात आला आहे.
सदर महिलांचे डोकेस काळे पांढरे बारीक केस आहेत सदर बाबत जेजुरी पोलीस स्टेशन येथे प्रदीप गंगाराम खोमणे रा. खोमणे नगर जेजुरी ता. पुरंदर, जि. पुणे यांनी खबर दिली असून त्यावरून जेजुरी पोलीस स्टेशन अकस्मात मयत रजिस्टर नंबर 88/24 बी.एन.एस.एस.194 प्रमाणे मयत दाखल करण्यात आले आहे.

सदर मयताचा तपास स.पो.नि. दीपक वाकचौरे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार ननवरे करीत आहेत तरी सदर माहिती बाबत काही एक माहिती मिळाल्यास जेजुरी पोलीस स्टेशन येथे संपर्क करावा.